क्राईम

औरंगाबादमध्ये हत्येचे सत्र सुरुच; मामानेच केला भाच्याचा खुन…

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठी वाढ झाली असून काही दिवसांपूर्वी भर चौकात खून केल्याची घटना ताजी असताना काल बुधवारी मामाने भाच्याला यमसदनी पाठवल्याचे धक्कादायक घटना समोर आली असून सय्यद माजिद सय्यद पाशा (वय ३५), रा.गल्ली क्र-६, किराडपुरा असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजीद सय्यद पाशा आणि आरोपी जवळचे नातेवाईक आहेत. बुधवारी रात्री किराडपुरा येथे एका पाच वर्षीय चिमुकल्याचा वाढदिवस होता. यानिमित्ताने आयोजित पार्टीत सर्व नातेवाईक एकत्र आले होते. मात्र, बारा वाजेच्या सुमारास त्यांच्यात अचानक वाद सुरु झाले. आरोपी त्यांचे काका सय्यद मजीद पाशा, सय्यद जावेद पाशा यांच्या घरा समोर असताना काका मजर पठाण, मुज्जू पठाण, अरबाज पठाण, जाकेर पठाण, सलमा पठाण (सर्व रा. किराडपुरा) यांनी तक्रारदार सय्यद अजिज सय्यद वाजेद यांच्या कुटुंबावर हल्ला चढवला.

हल्लेखोरांनी अचानक चाकूने व रॉड ने अजीज, त्यांचे काका व वडिलांना मारहाण करून गंभीर जखमी केले. तर त्यांचा भाऊ माजेद वर खोलवर वार केले. यात जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार दरम्यान माजेद यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच उपयुक्त शीलवंत नांदेडकर, एसीपी विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक अशोक भंडारी यांनी धाव घेतली. तत्काळ पहाटे मुज्जू उर्फ शेरखान मझहर पठाण (वय 18), अरबाज मझहर पठाण (वय 22) यांना अटक करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

24 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

24 तास ago