क्राईम

मुंबई हादरली! ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, ८ मुलींचा समावेश, पोलिसांचा हाय अलर्ट

मुंबई: मुंबईकरांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवघ्या मागील ३६ तासांत मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली असून, यामध्ये ८ मुलींचा समावेश आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने मुले बेपत्ता झाल्याने मुंबई पोलिसांनी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.

ही मुले मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे शहरात मानवी तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्या सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पालकांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोणकोणत्या भागातून मुले बेपत्ता?

शिवाजीनगर – ४

साकीनाका – २

अँटॉप हिल – २

ओशिवरा – १

मानखुर्द – १

बांगूर नगर – १

घाटकोपर – १

आतापर्यंत कोणत्याही कुटुंबाला खंडणीचे कॉल आलेले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथके नेमली असून, शहरभर शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

शोधमोहीम तीव्र

गजबजलेल्या बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, सार्वजनिक उद्याने, रुग्णालये, बालगृहे तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी बेपत्ता मुलांचे फोटो प्रसारित करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत बेपत्ता मुलांची वाढती संख्या

गेल्या काही महिन्यांत मुंबईत अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जून ते डिसेंबर या कालावधीत एकूण १४५ मुले बेपत्ता झाली असून, त्यापैकी ९३ मुली आहेत.

१ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीतच ८२ जण बेपत्ता झाल्याची नोंद असून, त्यामध्ये

१८ वर्षांखालील ४१ मुली

१३ मुले यांचा समावेश आहे.

महिन्यानुसार बेपत्ता मुलांची संख्या

जून: २६ मुली

जुलै: २५ मुले (१५ मुले, १० मुली)

ऑगस्ट: १९ मुले (५ मुले, १४ मुली)

सप्टेंबर: २१ मुले (६ मुले, १५ मुली)

ऑक्टोबर: १९ मुले (१२ मुले, ७ मुली)

नोव्हेंबर: २४ मुले (९ मुले, १५ मुली)

डिसेंबर: ११ मुले (५ मुले, ६ मुली)

मुंबईसारख्या महानगरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच मुलांचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

10 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

16 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

16 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

17 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

17 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

17 तास ago