क्राईम

कोंढापुरीत जमिनीत प्रवेश करत मायलेकांना मारहाण

शिक्रापूर: कोंढापुरी (ता. शिरुर) येथे जमीन मालकाच्या संमतीशिवाय त्याच्या जमिनीत जात जमीन मालकासह त्याच्या आईला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हनुमंत पांडुरंग डोमाळे, कल्पना हनुमंत डोमाळे व संतोष पोपट डोमाळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोंढापुरी (ता. शिरुर) येथील योगेश गायकवाड हे त्यांच्या जागेमध्ये असताना शेजारील जागा मालक हनुमंत डोमाळे यांच्या सांगण्यावरुन त्याची पत्नी कल्पना डोमाळे हि गायकवाड यांच्या जागेत येत योगेश यांना शिवीगाळ, दमदाटी करत डोक्यात दगड घालून मारण्याची धमकी देऊ लागली. यावेळी योगेशची आई मध्ये आल्याने कल्पना डोमाळे हिने योगेशच्या आईला देखील मारहाण केली तसेच संतोष डोमाळे याने दोघांना शिवीगाळ, दमदाटी केली.

याबाबत योगेश सदाशिव गायकवाड (वय ४२) रा. कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी हनुमंत पांडुरंग डोमाळे, कल्पना हनुमंत डोमाळे, संतोष पोपट डोमाळे सर्व रा. डोमाळे वस्ती कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन मोरे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

3 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

21 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago