क्राईम

पाबळ मध्ये अपघातानंतर टोळक्याकडून व्यक्तींना मारहाण

मारहाण करत दोन वाहनाच्या काचा व टायर फोडून नुकसान

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे 2 वाहनांचा किरकोळ अपघात झाल्यानंतर चर्चा सुरु असताना दहा जणांच्या टोळक्याने काही इसमांना मारहाण करत त्यांच्या 2 वाहनांच्या काचा व टायर फोडून नुकसान केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अर्जुन जाधव या युवकासह अनोळखी 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील वक्रतुंड हॉटेल येथे विठ्ठल कामठे व त्यांचे मित्र गोरक्ष लंघे, ज्ञानेश्वर पुंडे, सयाजी मिंडे, गणेश लंघे, योगेश पवार व कानिफनाथ भोर हे सर्व त्यांच्या जवळील एम एच १४ के जे ३९९३ व एम एच १४ ई पी ३१७० या दोन कार मधून चाललेले असताना समोरुन आलेल्या एका अल्टो कारचा आरसा कामठे यांच्या कारला लागून किरकोळ अपघात झाला. त्यामुळे कामठे यांचे काही मित्र व अल्टोकार चालक चर्चा करत असताना एक व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन येथे काय करता असे म्हटला असता कामठे यांनी आमच्या कारचा अपघात झाला आम्ही चर्चा करतोय तुम्ही जा असे म्हटले त्या वेळी काही युवक तेथे आले त्यांनी कामठे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी लगेच काही युवकांना बोलावून घेतले. त्यावेळी काही युवक आले त्यांनी कामठे यांच्यासह त्यांच्या मित्रांना शिवीगाळ, दमदाटी करत बेदम मारहाण केली.

यावेळी सयाजी मिंडे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व पैसे देखील पडले तर मारहाण करणाऱ्या युवकांनी कामठे यांच्या जवळील दोन्ही कारच्या काचा व टायर फोडले. दरम्यान तेथे लोकांची गर्दी होऊ लागल्याने सर्वजण निघून गेले.

याबाबत विठ्ठल दत्तू कामठे (वय ४०) रा. सविंदणे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अर्जुन जाधव रा. पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे याच्या सह अनोळखी 9 युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago