शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरांतील पुणे-नगर महामार्गावर ‘दि नाना स्पॉट’ हॉटेल जवळ दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करुन झाडाझडती घेताच त्यांच्याकडे पाच गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. अनिकेत विलास गव्हाणे (वय २० रा. गव्हाणवाडी, गोपाळवस्ती ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) तसेच मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २० रा. जवळा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) या दोघांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या सराईतावर पोलीस प्रशासनाने कारवाया केलेल्या असताना नुकतेच शिरुर शहरात पाच पिस्तुल घेऊन आलेल्या दोघांना पोलिसांनी पाच पिस्तुलसह जेरबंद केल्याने शिरुर तालुक्यात असे अनेक पिस्तुलधारी शिरुर तालुक्यात खुलेआमपणे फिरत असल्याचे नागरीक खाजगीत सांगत असुन त्यांच्याही मुसक्या आवळण्याचे आव्हान शिरुर पोलिसांपुढे आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार शिरुर शहरातील बायपास रोड लगत असलेल्या ‘दि नाना स्पॉट’ हॉटेल जवळ दोघे युवक पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळाली होती. त्यांनतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या सुचनेने सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी, पोलीस हवालदार नाथा जगताप, रघुनाथ हळनोर, निखील रावडे, विजय शिंदे, निरज पिसाळ यांसह आदींनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला असता त्यांना दोन संशयीत युवक आल्याचे दिसले.
त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या जवळ जात त्यांची चौकशी करत झडती घेतली असता त्यांच्या जवळ तब्बल पाच गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतुस मिळून आले. दरम्यान पोलिसांच्या पथकाने त्यांच्या जवळील सर्व पाच पिस्तुल व जिवंत काडतुसांसह त्यांना ताब्यात घेत त्याच्यावर शिरुर पोलिस स्टेशन येथे आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी हे करत आहे.
शिरुरच्या पोलिस निरीक्षकांची “दबंगगिरी”…
शिरुर शहराचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी शिरुर पोलीस स्टेशनचा कारभार हाती घेताच दंबंग कारवाई करत वाहतुकीला शिस्त लावत रोडरोमिओवर, अल्पवयीन वाहन चालक, वाहनधारकांवर जोरदार कारवाई केली आहे. त्यांनी केलेल्या कारवाईमुळे अनेक गुन्हेगारांनी धसका घेतला असुन, आता बेकायदेशीररीत्या पिस्टल बाळगणाऱ्यांकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असुन नागरीकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. तसेच शिरुर शहरासह ग्रामीण भागात अशा प्रकारे अनधिकृतपणे पिस्टल बाळगुन दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेने केली आहे.
दिलीप वळसे पाटलांच्या बॅनरवरुन ४२ गावचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब; चर्चांना उधाण
शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक
हृदयद्रावक! शिरूर तालुक्यातील मुलाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…