राजकीय

‘ती’ बातमी निराधार आणि खोडसाळ : दिलीप वळसे-पाटील

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये अनेकजण प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आता दिलीप वळसे-पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा होती. पण या बातम्या निराधार आणि खोडसाळ असल्याचे सांगत दिलीप वळसे-पाटील यांनी ही चर्चा फेटाळळी आहे.

शरद पवार यांना आपण भेटणार असल्याच्या बातम्या निराधार आणि खोडसाळ आहेत. माध्यमांमध्ये याबाबत सुरू असलेल्या बातम्या या चुकीच्या आहेत. सध्या आपण मतदारसंघात दौऱ्यावर असून दिवसभर ठिकठिकाणी सभा आणि बैठका घेत आहोत, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, शरद पवार यांचे मानसपुत्र समजले जाणारे दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि ते अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने वळसे पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी वळसे पाटील यांच्या आंबेगाव या मतदारसंघात दोन सभा घेतल्या होत्या. त्यानंतर शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनाही वळसे पाटील यांच्या मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले आहे.

आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम यांनी तयारी सुरू केली असून, त्याला शरद पवार यांनी बळ दिल्याचे समजत आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.

दिलीप वळसे पाटलांच्या बॅनरवरुन ४२ गावचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब; चर्चांना उधाण

दिलीप वळसे पाटील अन् देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची…

दिलीप वळसे पाटील यांची कन्या तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविणार? शरद पवार म्हणाले…

दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…

अजित पवार यांना धक्का! दिलीप वळसे पाटील परतीच्या मार्गावर…

दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट; चर्चांना उधाण…

ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

17 मिनिटे ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

60 मिनिटे ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

1 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

2 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

20 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

24 तास ago