क्राईम

रांजणगावमध्ये टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू; तर एक जखमी…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील महागणपती मंदिराच्या समोर बुधवारी (ता. ६) रोजी टँकरने धडक दिल्याने गोरक्ष शंकर भुजबळ (वय 55, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.

अपघातात भुजबळ यांचे नातेवाईक भीमा हरिभाऊ गोरे (रा. वाडेगव्हाण, ता.पारनेर, जि.अहमदनगर) हे जखमी झाले आहेत. याबाबत विश्वास गोरक्ष भुजबळ यांनी फिर्याद दिल्याने टँकर चालक समद मोहम्मद पटेल (ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) याच्यावर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ६) सकाळी १०:३० च्या सुमारास महागणपती मंदिराच्या समोर पुणे-नगर रोडवर गोरक्ष भुजबळ हे आपल्या दुचाकी क्रं. एम एच 12 जी एच 1226 वरुन चालले होते. यावेळी पुण्याकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या टँकर क्रं. एम एच 20 ई जी 9014 ची त्यांना धडक बसल्याने अपघात झाला. यावेळी तिथे उपस्थीत असलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने हॉस्पिटल मध्ये नेले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार मारुती पासलकर करत आहेत.

unique international school
शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

20 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

21 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

21 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

21 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

21 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

21 तास ago