शिक्रापूर (शेरखान शेख): खैरनगर (ता. शिरुर) येथील माजी सरपंचा कडून विद्यमान सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयात शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माजी सरपंचावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खैरेनगर (ता. शिरुर) येथील विद्यमान सरपंच संदीप खैरे यांना माजी सरपंच एकनाथ खैरे यांनी मारहाण केल्याची घटना शनिवार (दि. २१) ऑक्टोबर रोजी घडली असून ग्रामपंचायत च्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची हाणामारी ची घटना शिरुर तालुक्या सह परिसरातील गावांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार माहितीनुसार शनिवार (दि. २१) ऑक्टोबर रोजी माजी सरपंच एकनाथ खैरे हे ग्रामपंचायत कार्यालयात गेले यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संदीप खैरे हे कामकाज करत होते.
दरम्यान एकनाथ खैरे यांनी सरपंच संदीप खैरे यांना शेत पिकांच्या पंचनाम्या बाबत मेसेज व्हाट्सअप ग्रुप वर का टाकला नाही असा जाब विचारत शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली. याबाबत सरपंच संदीप खैरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माजी सरपंच एकनाथ खैरे यांच्या विरोधात तक्रार दिली असल्याने पोलिसांनी खैरेनगर चे माजी सरपंच एकनाथ खैरे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…