शिरूर तालुका

शिक्रापूर चाकण रस्त्यावर युवकांनी बुजवले स्वखर्चाने खड्डे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने सध्याच्या वाहतूक कोंडीत अनेक अपघात होत असल्याने स्थानिक युवकांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपत रस्त्यावर खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवत आदर्श निर्माण केला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना खड्डे दिसत नसल्याने अनेक वाहन चालकांना रस्त्यांवरील खड्डे दिसत नसल्याने अपघात होऊन काही नागरिकांना दुखापत देखील झालेल्या असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन खेडकर, गौरव जाधव, अमोल बैलभर, गौतम जाधव, अमोल काकडे, बळीराम नाईकरे यांसह आदींनी स्वखर्चाने चाकण चौक तसेच तोल नाका परिसर येथील रस्त्यावरील खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकी जपली आहे, तर युवकांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे वाहन चालक देखील समाधान व्यक्त करत असून परिसरातून युवकांचे कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

8 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

11 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

13 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago