शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे भेळपुरीची हातगाडी चालवून व्यवसाय करणाऱ्या युवकाची हातगाडी व साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे अम्बा लाल या युवकाचा भेळपुरीचा छोटासा व्यवसाय असून हातगाडीवर सदर युवक व्यवसाय करतो. 25 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी अम्बा लाल हा गाडी बंद करुन घरी गेला होता. सकाळच्या सुमारास पुन्हा सदर ठिकाणी आला असता त्याला त्याची हातगाडी दिसून आली नाही त्यामुळे त्याने सर्वत्र शोध घेतला असता हातगाडी चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
याबाबत अम्बा उदाजी लाल (वय ३५) रा. बजरंगवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. पालोट ता. डुंगला जि. चित्तोडगड राजस्थान याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बापू हडागळे हे करत आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…