मुख्य बातम्या

तरुणांना राजकारणात संधी मिळणे गरजेचे:- डॉ. वर्षा शिवले

शिक्रापूर (शेरखान शेख) सध्याच्या बदलत्या काळामध्ये राजकारणात येण्यासाठी अनेकजण इच्छुक असुन तरुणांकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा वाढल्या असुन तरुणांनी अनेक समाजपयोगी उपक्रम तसेच बदल घडवले असल्याने तरुणांना तसेच महिलांना राजकारणात संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश चिटणीस डॉ. वर्षा शिवले यांनी व्यक्त केले. हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथे डॉ. वर्षा शिवले यांची राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमोल जगताप, उद्योजक विकास गायकवाड, सरपंच शारदा गायकवाड, उपसरपंच दिपक खैरे, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ शिर्के, सोमनाथ आढागळे, नयना मांदळे, दिपाली मांदळे, हौसाबाई गायकवाड, साधना गायकवाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शरद तांबे, रेवणनाथ जाधव यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना शिवले म्हणाल्या, महिलांना राजकारणात संधी मिळाल्यास महिला देखील सक्षमपणे काम करू शकतात हे अनेक राजकीय महिलांनी त्यांच्या कार्यातून सिध्द केलेले आहे तसेच तरुणांना मिळालेल्या संधीचे तरुणांनी सोने केल्याच्या अनेक घटना आपल्याकडे आहे, त्यामुळे तरुणांसह महिलांनी देखील राजकारणात सक्रीय होण्याची गरज असताना तरुणांना व महिलांना राजकारणात संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश चिटणीस डॉ. वर्षा शिवले यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

21 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

21 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

22 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago