क्राईम

जावयाने सासरवाडीत जाऊन केली तिघांची हत्या…

शिर्डी : शिर्डीजवळ असलेल्या सावळीविहीर गावात जाऊन जावयाने तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावळीविहीर गावातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबावर जावयाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

जावयाने केलेल्या या हल्ल्यात पत्नी, मेव्हणा आणि आजेसासूचा मृत्यू झाला आहे. सुरेश निकम आणि रोशन निकम यांनी रात्री सासुरवाडीत हे भीषण हत्याकांड केले. धारदार चाकूने वार केल्यामुळे सुरेशची पत्नी वर्षा, मेव्हणा रोहित आणि आजेसासू हिराबाई यांना जीव गमवावा लागला आहे. तर सासू-सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शिर्डीीतल साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी दाखल केले. पण, उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता, तर तिघांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. पोलिसांनी तातडीने चार पथकं रवाना केली आणि नाकाबंदी करत पहाटेच्या वेळी नाशिकहून रेल्वेने फरार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी सुरेश निकम आणि रोशन निकम यांना अटक केली आहे.

सुरेशचा विवाह आठ वर्षांपूर्वी वर्षासोबत झाला होता, त्यांना दोन लहान मुलीही आहेत. वारंवार होणाऱ्या कौटुंबिक कलहातून सुरेशने हे हत्याकांड केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या हत्याकांडामध्ये पत्नी वर्षा निकम (वय 24), मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड (वय 25) आणि आजेसासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय 70) यांचा मृत्यू झाला. तर सासरे चांगदेव द्रोपद गायकवाड (वय 55), सासू संगीता चांगदेव गायकवाड (वय 45) आणि मेव्हणी योगिता महेंद्र जाधव (वय 30) अशी तीन जखमींची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

उपसरपंचाच्या पत्नीची गळफास घेत आत्महत्या…

लग्न अवघ्या 11 दिवसांवर असताना तरुणाची गोळी झाडून हत्या…

शिरुर तालुक्यात विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासु-सासऱ्यावर गुन्हा दाखल 

अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणी 20 दिवस उलटूनही कारवाई नाहीच…

दिशा भोईटे हिचे निधन; मृत्युबाबत संशय; कारवाईची मागणी!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

11 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago