महाराष्ट्र

मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा आठ दिवस दर्शनासाठी बंद…

सातारा : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळुबाईचे मंदिर आठ दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गाभाऱ्यातील दुरुस्तीच्या कामासाठी मंदिराचा संपूर्ण गाभारा बंद ठेवला जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीने दिली. आहे.

मांढरदेवी गडावरील काळुबाईचे मंदिर 21 ते 28 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवले जाणार आहे. या कालावधीत भाविकांना मात्र बाहेरुनच दर्शन घ्यावे लागणार आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या भाविकांना ज्यांना बाहेरुन दर्शन घ्यायचे आहे ते मात्र या गडावर येऊ शकतात. मात्र, गाभाऱ्यात जाऊन देवीचे मुख दर्शन घेता येणार नाही, असे समितीकडून कळवण्यात आले आहे.

मांढरदेवी गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. या कालावधीत भाविकांना बाहेरुनच दर्शन घ्यावे लागणार आहे. मात्र कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मांढरदेव गडावरील काळूबाई नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका आहे. राज्यभरातील लाखो भाविक या ठिकाणी देव दर्शनासाठी येत असतात. शाकंबरी पौर्णिमेला मांढारदेवी गडावर सुमारे 7 ते 8 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. गडावरच्या भाविकांच्या गर्दीमुळे पूर्वी या ठिकाणी नारळ, तेल, लिंबू यांचा मोठा सडा येथे पाहायला मिळायचा. या ओलाव्यातून घसरडे झालेल्या पायऱ्यांवरुन काही भाविक घसरले जात होते. याच कारणातून 2005 मध्ये गडावर मोठी चेंगरा-चेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 295 भाविकांचा चिरडून मृत्यू झाला होता.

देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन असल्याचे काही पुरावे आढळले आहेत. सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून 4650 फूट टेकडी वर हे मंदिर आहे. मंदिर लहान असून त्यास सभामंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आहे आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय, सिंह यांच्या मूर्ती बसविलेल्या आहेत.

संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या मंदिरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण

रांजणगाव येथे मुक्तद्वार दर्शनाला लाखों भाविकांची गर्दी

नक्की काय आहे रांजणगाव गणपतीचा इतिहास…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

36 मि. ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago