क्राईम

Video: शिरूर तालुक्यात दुचाकींची समोरासमोर जोरात धडक; जागीच मृत्यू…

शिरूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील न्हावरे-निर्वी रोड येथे दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. ३०) रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात प्रकाश संपत शेलार (वय ३७ रा.निर्वी, ता. शिरूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे .

याप्रकरणी बंडू बापूराव शेलार (रा. निर्वी ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मच्छिंद्र गोविंद माळी (वय अंदाजे ४०, मूळ रा. पिंपरखेड, ता. नांदगाव, जि. नाशिक) या दुचाकीस्वाराच्या विरोधात अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकींमधील भीषण अपघाताचा Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंडू शेलार यांचा पुतण्या प्रकाश न्हावरे येथून त्याच्या दुचाकीवरून (एम एच -१२ -डी क्यू ९९६०) निर्वीकडे जात होता. यावेळी प्रकाश हा ड्रीम फिटनेस क्लबजवळ गेल्यानंतर निर्वी बाजूकडून येणाऱ्या (दुचाकी एम एच १७ के एच ३०८१) दुचाकीवरील मच्छिंद्र याने भरधाव वेगाने प्रकाश याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. मच्छिंद्र याने निष्काळजीपणे दुचाकी चालवून समोरून येणाऱ्यास धडक दिली. या अपघातात प्रकाश संपत शेलार यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

रांजणगाव एमआयडीसीमधील कंपनीत कामगाराचा मृत्यू…

तळेगाव-न्हावरे रोडवर अपघातात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू…

कवठे येमाई येथे अपघातात एक ठार, दुसरा गंभीर जखमी…

भीषण अपघात; लोणीकंद-थेऊर रस्त्यावर अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर पाच जण जखमी…

तळेगाव-न्हावरे रोडवर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन पिकअप चालकाने ठोकली धूम…

दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघांसह चिमुकला ठार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

18 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago