क्राईम

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर युवकाचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गणेश बाबुराव इचके हा युवक अष्टविनायक महामार्गावर म्हाळोबा नगर कडे जाणारे फाट्याजवळ पायी चालत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी होऊन मुत्यू पावला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गुरुवारी (ता. २१) रात्री ०९/३० वा ते शुक्रवारी (ता. २२) ०१/०० वा.चे दरम्यान कवठे येमाई गावच्या हद्दीत पारगाव शिंगवे ते कवठे येमाई कडे जाणारे अष्टविनायक हायवे रोडवर म्हाळोबा नगर कडे जाणारे गणेश बाबुराव इचके (वय ३५ वर्षे रा. म्हाळोबा नगर कवठे येमाई ता. शिरूर जि. पुणे) हा पायी चालत जात होता. त्यास कोणत्या तरी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने, अविचाराने, रहदरीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून गणेश यास धडक दिली. त्याच्या डोक्यास, हातापायाला, पाठीला, लहान मोठ्या गंभार दुखापती होवुन त्याच्या मुत्युस कारणीसभुत झाला आहे व अपघाताची खबर न देता निघून गेला आहे.

याबाबत गणेश बाबुराव इचके यांचा भाऊ सुनिल बाबुराव इचके यांनी शिरूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहेत.

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी कारेगावच्या फरार सोनारास अटक करत 91 तोळे सोन्याचे दागीने केले जप्त

शिरुर तालुक्यात लग्नाच्या मध्यरात्रीच दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम…

भीषण अपघात! शिरूर तालुक्यात एसटीच्या चाकाखाली घुसली दुचाकी…

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

6 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

13 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

13 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

13 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

14 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

14 तास ago