शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भाजपच्या नेत्याच्या फार्म हाउसवर एका 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून सदर बलात्कार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करत भाजप नेत्याची चर्चा नको म्हणून प्रकरण दाबले जाणार असेल तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका भाजप नेत्याच्या फार्म हाउसवर 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. घटनेबाबत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र यानंतर सदर घटनेशी भाजप नेत्याचा कोणताही संबंध नसला तरी ते फार्म हाउस भाजप नेत्याच्या मालकीचे असल्यामुळे या नेत्याच्या तसेच त्याच्या फार्म हाउसची चर्चा कोठे नको, यासाठी सदर प्रकरण दाबले जाण्याची शक्यता तृप्ती देसाई यांनी वर्तवली आहे.
सदर बलात्कार प्रकरण तातडीने फास्टट्रॅक कोर्टात चालवत पिडीत मुलीला न्याय देण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत भाजप नेत्याची चर्चा नको म्हणून प्रकरण दाबले जाणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
सदर प्रकारात भाजप नेत्याचा कोणताही संबंध नाही, तसेच बलात्कार प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करत न्यायालयात हजर केले असता त्याचा 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असून घटनेतील तपास यंत्रणेवर कोणताही दबाव नसल्याचा निर्वाळा शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केला आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…