क्राईम

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू तर तिघे जखमी…

शिरूर (सुनिल जिते): मलठण रस्त्यावरील आमदाबाद फाट्याजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे तेथील नागरिक सांगत आहे.

शिरुर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात १६ फेब्रुवारी रोजी दुपारी चार चार वाजण्याच्या सुमारास आमदाबाद-मलठण महामार्गांवर , माशेरेमळा येथे घडला फिर्यादी शिवम सत्यवान साळवे (रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कार चालक संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूर मेसाई, जि. पुणे) याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर अपघातात धिरज राजू पवळे (वय २४), त्यांची पत्नी वैभव धिरज पवळे (वय २१) व आई गोपिका राजू पवळे (वय ४५) हे तिघे जखमी झाले. त्यांच्या डोके, हात, पाय, छाती व मणक्याला गंभीर दुखापती झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यासोबत असलेला तीन वर्षांचा विराज धिरज पवळे याचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व जखमी व मृत बालक हे कोयाळी (ता. खेड, जि. पुणे) येथील रहिवासी आहेत.

अपघातानंतर फिर्यादी साळवे यांनी तत्परता दाखवत जखमींना शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र चिमुकल्याचे प्राण वाचवता आले नाहीत. प्राथमिक तपसता चारचाकी चालकाने वेग व निष्काळजीपणा केल्यामुळे अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अरुण उबाळे हे करत आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली . सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरीकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

शिरूर तालुक्यात भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी…

शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…

शिरूरमध्ये अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक बसविण्याची नागरीकांची मागणी

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात आईचा जागीच मृत्यू, दोन चिमुकले जखमी…

शिरूर येथे भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार तर एक जखमी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

15 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

16 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

23 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

3 दिवस ago