मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण ते कवठे या अष्टविनायक महामार्गावर दरम्यान सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी तातडीने दुभाजकासह गतिरोधक व अन्य आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मलठण ते कवठे यादरम्यानचा अष्टविनायक महामार्ग शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातून गेला आहे. या महामार्गावरून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. महामार्ग सुरू झाल्यापासून कवठे येमाई, शिंदे वाडी, मलठण, या ठिकाणी मोठे अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांचे प्राण देखील गेले आहेत. त्यामुळे हा महामार्ग आणखी किती जणांचे बळी घेणार? असा प्रश्न येथील नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.
View this post on Instagram
या महामार्गामुळे वाहनचालकांचा प्रवास सुखकर झाला आहे. त्यामुळे वेळेची बचत होत आहे. परंतु, अतिवेगामुळे वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत. महामार्ग प्रशासनाने वळणाच्या ठिकाणी अथवा अपघात घडणाऱ्या ठिकाणी सूचनाफलक लावणे आवश्यक आहे. तसेच गाव असलेल्या ठिकाणी रस्त्यालगत संरक्षक लोखंडी पाइप व पिवळे ब्लिकर दिवे लावणे आवश्यक आहे. परंतु, महामार्ग अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. या महामार्गांवर गेल्या पाच दिवसापूर्वी अपघात होऊन एक तरुण युवकाचा प्राण गेला आहे. अपघाताच्या अनेक घटना ताज्या असून यावर प्रशासन काय भूमीका घेणार यावर सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
सायंकाळी वाहनांची भरधाव स्पर्धा…
दुपारी वाहनात भरलेला ऊस कारखान्यावर पोहोचविण्याच्या घाईत क्षमतेपेक्षा जास्त भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवले जाते. सायंकाळी नोकरदार, कामगार व विद्यार्थ्यांची तसेच शाळकरी मुलांची रस्त्यावर गर्दी असते. मात्र, धोकेदायक ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना याची काहीच फिकीर नाही.
अनेक वाहनांवर रिफ्लेक्टरच नाही…
शिरूर तालुक्यात अनेक मोठी देवस्थान असून या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांना या अष्टविनायक महामार्ग ने प्रवास करावा लागतो. अनेक वाहनांवर रिफ्लेक्टर लावले नसल्याने रात्री अपघाताला निमंत्रण मिळत आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीचा तसेच ट्रॅकचा अंदाज न आल्याने मार्गावर अपघाताची शक्यता आहे.
शिरूर शहर परिससरातील रस्त्यांवर अपघातांचा धुमाकूळ, सार्वजनिक बांधकाम विभाग कोमात
शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…
शिरूर शहर व तालुक्यात बेकायदा गतीरोधकांचा हैदोस; अपघातांमध्ये वाढ, नागरिकांमध्ये संताप
शिरूरमध्ये अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक बसविण्याची नागरीकांची मागणी
Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात आईचा जागीच मृत्यू, दोन चिमुकले जखमी…