क्राईम

शिरूर तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून मारहाण; दोन महिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…

न्हावरे: पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे शेतजमिनीची मशागत सुरु असताना शेजारील जमीनधारकांनी कामाला विरोध करत ६५ वर्षीय शेतकरी, त्यांची पत्नी आणि मुलाला शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याला दगडाने, तर त्यांच्या मुलाला बांबूच्या काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांविरोधात शिरूरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधाकर दत्तात्रय मोरे (वय ६५, रा. लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन अक्षय मच्छिंद्र भोसले, शुभम ऊर्फ ऋषी मच्छिंद्र भोसले, पुतळाबाई प्रल्हाद भोसले, कमल मच्छिंद्र भोसले आणि नागेश कैलास ढवळे (सर्व रा. पिंपळसुटी, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पिंपळसुटी गावच्या हद्दीतील गट क्रमांक ४१/२ मध्ये घडली. फिर्यादी मोरे हे पत्नी सुनीता आणि मुलगा संग्राम यांच्यासोबत जेसीबीच्या साहाय्याने आपल्या शेतजमिनीची मशागत करण्यासाठी आले होते.

शेतीची मशागत सुरु असताना आरोपी तेथे आले. “तुम्ही येथे काम करायचे नाही,” असे म्हणत त्यांनी कामाला विरोध केला. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ व दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी सुधाकर मोरे यांना दगडाने मारहाण करण्यात आली, तर त्यांचा मुलगा संग्राम याला बांबूच्या काठीने मारण्यात आले. तसेच सुधाकर मोरे, त्यांची पत्नी सुनीता आणि मुलगा संग्राम या तिघांनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेनंतर सुधाकर मोरे यांनी शिरूरपोलिस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात कायदेशीर फिर्याद दिली. शिरूरपोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गवळी पुढील तपास करत आहेत.

शिरूर बसस्थानकात दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील ११ ग्रॅम सोन्याचे गंठण लंपास

शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे मोठे जाळे पुन्हा उघड!

शिरूर! सणसवाडीत सहकाऱ्याने गुदद्वारात घातला कॉम्प्रेसरचा पाइप अन्…

शिरूर तालुक्यात खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन; महिलेचा मृत्यू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

6 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

1 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago