क्राईम

शिरूर! आमची पाइपलाइन तोडू नका असे सांगताच लाथाबुक्क्यांनी मारहाण…

न्हावरे: पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे शेतातील पाण्याची पाइपलाइन जेसीबीच्या साह्याने तोडल्याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत एक जण जखमी झाला असून, महिलांसह अन्य व्यक्तींनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी सुधाकर दत्तात्रय मोरे, संग्राम सुधाकर मोरे, सुनिता ऊर्फ सुमिता सुधाकर मोरे, (सर्व रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, जि. पुणे) आणि पंकाबाई संभाजी सोनवणे (रा. निर्वी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरोधात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कमल मच्छिंद्र भोसले (वय ५०, व्यवसाय शेती, रा. पिंपळसुटी) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. ९ जुलै २०२६) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पिंपळसुटी गावच्या हद्दीतील शेतात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल भोसले या त्यांचा मुलगा अक्षय याच्यासोबत शेतात काम करीत होत्या. त्यावेळी शेजारील शेतजमीन असलेले शेजारी जेसीबी मशीन घेऊन त्यांच्या शेताजवळ आले. या जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्या शेतातील पाण्याची पाइपलाइन तोडून नुकसान करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

“आमची पाइपलाइन तोडू नका,” असे सांगितल्यानंतर संबंधितांनी कमल भोसले आणि त्यांचा मुलगा अक्षय यांना लाकडी काठीने तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत अक्षय भोसले जखमी झाला. यावेळी भांडण सोडविण्यासाठी कमल भोसले यांचा लहान मुलगा शुभम आणि सासू पुतळाबाई घटनास्थळी आले असता, त्यांनाही खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी शुभमच्या उजव्या खांद्यावर चावा घेऊन दुखापत करण्यात आली. तसेच सर्वांना शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सदर घटनेनंतर कमल भोसले यांनी शिरूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गवळी करीत आहेत.

शिरूर तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून मारहाण; दोन महिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर बसस्थानकात दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील ११ ग्रॅम सोन्याचे गंठण लंपास

शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे मोठे जाळे पुन्हा उघड!

शिरूर! सणसवाडीत सहकाऱ्याने गुदद्वारात घातला कॉम्प्रेसरचा पाइप अन्…

शिरूर तालुक्यात खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन; महिलेचा मृत्यू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

6 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

1 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago