शिंदोडी (तेजस फडके) : शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट, निर्वी आणि कोहकडेवाडी येथे 1 एप्रिल रोजी गारपीट झाली होती. त्यानंतर गुनाट गावातील गुणवंतवाडी येथे विजेचे खांब पडल्याने विजेचा खोळंबा झाल्याने सलग सात दिवस ग्रामस्थांना मोठया अडचनींचा सामना करावा लागला. तसेच वीज नसल्यामुळे सोमवार (ता. ६) रोजी सायंकाळी सुमारे ७:३० च्या सुमारास येथील शेतकरी हनुमंत गव्हाणे यांच्या घरासमोरील गोठ्यात घुसून बिबट्याने एका बोकडाचा बळी घेतला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुनाट गावात गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी (ता. 3) शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार हे दोघेही गुणवंतवाडी येथे आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासुन विज पुरवठा खंडित असल्याची व्यथा दोन्ही आमदारांसमोर मांडली.
त्यानंतर दोन्ही आजी-माजी आमदारांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधत तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु सात दिवस उलटूनही मंगळवार (दि 7) रोजी उशिरापर्यंत वीज दुरुस्तीचे काम पुर्ण झालेले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांसाठी चारा व्यवस्थापन करणेही कठीण झाले आहे. त्यातच अंधारामुळे बिबट्या आणि अन्य वन्य प्राण्यांची भिती निर्माण झाली आहे. दोन्ही आजी-माजी आमदारांनी सुचना देऊनही महावितरणकडुन कामात दिरंगाई होत असल्यामुळे महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत न्हावरे येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता वैभव पळसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गुनाट पारिसरात बुधवार (दि 1) रोजी गारपिट झाल्याने अनेक विजेचे खांब पडले होते. परंतु ज्या ठिकाणी खांब पडले होते. तेथे दुसरे खांब उभे करण्यासाठी चिखल असल्यामुळे ट्रॅक्टर आणि इतर वाहने दोन ते तीन दिवस त्या ठिकाणी जाऊ शकली नाही. त्यामुळे विजेचे खांब उभे करण्यासाठी आमचा जास्त वेळ गेला. सध्या या परिसरात युद्ध पातळीवर काम सुरु असुन मंगळवार (दि 7) रोजी सायंकाळी उशिरापर्यंत गुणवंतवाडी येथील विजपुरवठा सुरळीत होणार आहे.
Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…
Video: शिरूरचे दोन्ही आजी-माजी आमदारांनी गुनाट गावाला भेट देत केली गारपिटीची पाहणी…
शिरूर तालुक्यात डीपी चोरीचे प्रमाण वाढले; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…
शिरूर! राजस्थान ढाबा पार्किंगमध्ये भीषण अपघात; ट्रक अंगावरून गेलेल्या तरुणाचा मृत्यू…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…