क्राईम

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने शेतकऱ्यांच्या प्रत्येकी १० एचपी क्षमतेच्या दोन मोटारी चोरून नेल्या असून, या चोरीत सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

शिरुर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इनामगाव येथील शेतकरी प्रविण रावसाहेब मचाले (वय ४७, रा. इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली असुन बुधवार (दि ७) रोजी सायंकाळी सहा ते गुरुवार (दि. ८ ) रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली आहे.

इनामगाव येथील वनविभागाच्या शेतजमिनीतून अज्ञात चोरट्याने प्रविण मचाले यांची १० एचपी क्षमतेची विद्युत मोटार चोरून नेली आणि त्याच ठिकाणाहून निलेश शंकर गाजरे यांचीही १० एचपी क्षमतेची तारो कंपनीची विद्युत मोटार चोरीला गेली. दोन्ही मोटारींची एकूण अंदाजे किंमत २० हजार रुपये आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत

सध्या दुष्काळाच्या परिस्थितीत शेतातील विद्युत मोटारी चोरीला गेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या विद्युत मोटारींची चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

शिरूर तालुक्यात दुष्काळ अन् पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून घेतले जातात पैसे…

शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या

शिरुर; मालकाला संपवण्यासाठी रचलेल्या कटात कामगाराचा बळी; LCB आणि रांजणगाव पोलिसांकडुन सुपारीच्या कटाचा उलगडा

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! नगर-पुणे महामार्गावर धावत्या कंटेनरच्या टायरला आग; टाकीजवळच भडका…

कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या…

6 तास ago

शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात…

8 तास ago

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

2 दिवस ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

3 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

3 दिवस ago