hari-gangawane-shirur

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील लाटेआळी येथील आंबेडकर नगर परिसरात सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास युवकावर अज्ञातांनी गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात हरीश गंगावणे (वय ३३) याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणात तीन आरोपी असून तिघेही फरार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

मृत हरीश गंगावणे हा शहरात बिअर बार चालवत होता. खिशातुन दोन लाख रुपये काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद आहे. शिरुरमध्ये एका गणेश मंडळासमोर हरीश गंगावणे आणि आरोपीमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी मंडळाच्या समोरून पोलिस गस्त घातल होते. तेव्हा मंडळाच्या पोरांनी हा वाद मिटवला अन् दोघांना बाजूला केले. त्यानंतर सकाळी साडेसहाच्या सुमारास जेव्हा गंगावणे हा मित्रांसह दुचाकीवरून बाहेर पडला असताना दबा धरून बसलेल्या रोहित सोनवणे, अनिकेत गव्हाणे आणि आदित्य पवार यांनी हरिश गंगावणे याच्यावर गोळीबार केला. गावठी पिस्तुलमधून जवळून आरोपींनी गोळीबार केला. यात एक गोळी कानामागून मानेत घुसली तर दुसरी गेली हरिशच्या दंडाला चाटून गेली. यामध्ये हरीश गंगावणे याचा जागीच मृत्यू झाला. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

दरम्यान, गोळीबार करून पसार झालेल्या हल्लेखोरांची ओळख पकडण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास वेगाने सुरू केला आहे. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील उपलब्ध माहिती, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे पोलिस कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक केनेकर हे करत आहेत.

 

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर तालुक्यात पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग; गोळीबाराची घटना…

शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत