शिरूर तालुक्यात दुष्काळ अन् पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून घेतले जातात पैसे…

शिरूर तालुका

शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पीक नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, पीक पाहणीसाठी काही महसूल सहाय्यकांकडून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. एका गटासाठी ठराविक रक्कम निश्चित केल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कान्हूर मेसाई परिसरातील महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आला होता. मात्र, तक्रार करूनही त्यावर कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

एकीकडे शासनाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे पीक पाहणीच्या कामासाठीच शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे आरोप होत असल्याने या प्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

पीक पाहणीचे काम पारदर्शकपणे व्हावे, शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची रक्कम घेऊ नये आणि या आरोपांची तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत