क्राईम

शिरूर तालुक्यात ‘तुला संपवतो, स्लॅबखाली टाकून देतो’, असे म्हणत गजाने केला हल्ला…

शिंदोडी (तेजस फडके): जागा विक्रीस नकार दिल्याचा राग मनात धरुन एका ६० वर्षीय शेतकऱ्याला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील आंबळे गावात घडली आहे. या प्रकरणी संजय बाळासाहेब बेंद्रे याच्याविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास नारायण बेंद्रे (वय ६०, व्यवसाय शेती, रा. आंबळे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.२१ वाजण्याच्या सुमारास महेश विष्णु करे यांच्या बांधकाम सुरु असलेल्या स्लॅबवर हा प्रकार घडला. आरोपी संजय बेंद्रे याने बांधकामासाठी जागा कमी पडत असल्याचे सांगत फिर्यादीकडे त्यांच्या शेजारच्या ४ फूट रुंद व ६० फूट लांबीच्या जागेची मागणी केली. मात्र, फिर्यादीने स्पष्ट नकार देत विषय सोडून देण्यास सांगितले.

आरोपीचा त्याच क्षणी संताप अनावर झाला. फिर्यादी जिना उतरुन खाली जात असतानाच आरोपीने तेथेच पडलेला लोखंडी गज उचलून फिर्यादीच्या पाठीवर, डोक्यावर व डाव्या पायावर बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे विलास बेंद्रे खाली कोसळले. एवढ्यावर न थांबता आरोपीने त्यांना पायाला धरुन ओढत स्लॅबवरुन खाली फेकण्याचा प्रयत्न केला. तसेच “आज तुला संपवतो, स्लॅबखाली टाकून देतो,” अशी जिवे मारण्याची धमकी देत आरोपीने पुन्हा लोखंडी गजाने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गंभीर जखमी अवस्थेत विलास बेंद्रे यांनी स्लॅबच्या कॉलमला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे आंबळे गावात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीविरोधात शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार शिंदे करत आहेत. जागेच्या वादातून थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत मजल गेल्याने शिरूर तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शिरूर तालुक्यात फायनान्सच्या हप्त्यावरून युवकाच्या डोक्यात फोडली बाटली…

मी इथला भाई आहे… म्हणत रस्त्याच्या कामात दोन लाखांची खंडणी; तडीपार गुन्हेगाराची शिरूरमध्ये दहशत

शिरूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; तुझा कार्यक्रम करतोच…

शिरूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला घरफोडी प्रकरणातील चोरटा…

शिरूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला घरफोडी प्रकरणातील चोरटा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago