शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
शिरूर शहरातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून तिघा चोरट्यांनी २० एप्रिल रोजी सुमारे दोन लाख रुपयांची रोकड व पद्मावती देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. अनेक ठिकाणी यांनी चोऱ्या केल्या होत्या. या तीघांना गजाआड करून रबाळे पोलिसांनी त्यांची रवानगी तळोजा कारागृहामध्ये केली होती.
दरम्यान, शिरूरमधील मंदिरातील चोरीप्रकरणी अधिक तपासाकामी या तिघांना नुकतेच शिरूरला आणले होते. शिरूरमधील तपासानंतर दि. ०५ रोजी त्यांना पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांच्या पथकासह पुन्हा तळोजा कारागृहामध्ये नेले जात असताना कारागृहापासून काही अंतरावर मुजाहीद गुलजार खान (रा. कारेगाव, ता. शिरूर) याने लघुशंकेचा बहाणा करून वाहन थांबविण्यास भाग पाडले. आडोशाला जाताच पोलिसांना हिसका मारून पळून गेला होता. त्यानंतर शिरूर पोलिसांसह, क्राईम ब्रँच, तेथील स्थानिक पथक त्याचा शोध घेत होते. दोन दिवस रात्रदिवस अथक परीश्रम घेत बेलापूर पंचशिल परीसरात त्याचा मागोवा घेत या अट्टल गुन्हेगाराला गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे शिरुर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
शिरुर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मुंबई येथील तळोजा जेल जवळून आरोपी फरार…
शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांचे प्रश्नचिन्ह लागले ऊमटू…