शिक्रापूरः शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एका अल्पवयीन तीन वर्ष वीस दिवसांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बलात्कार करणारा आरोपी १३ ते १४ वर्षाचा अल्पवयीन आहे. याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
शिक्रापूर पोलिस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा रजिस्टर नंबर 883/2024 भारतीय न्याय संहिता कलम 65/2 बाल लैंगिक अत्याचार का क 4,8,12, नुसार संबंधित वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन वय 13 ते 14 वर्ष (रा. शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पवयीन आरोपी मूळचा जळगाव येथील आहे.
अल्पवयीन पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घरात खेळत होती. घराला बाहेरून कडी लावून कपडे वाळत घालण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर गेल्यानंतर कपडे वाळत घालून खाली घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात पाहिले असता, घरातील बेडवर अल्पवयीन आरोपी याने मुलीवर अतिप्रसंग केल्याचे दिसले, त्यानंतर तो तिथून पळून गेला. चिमुकलीला प्राथमिक उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या संदर्भातील पूर्ण माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार मध्ये दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिणी शिनवले करत आहेत.
शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार
शिरुर तालुक्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार
शिरुर तालुक्यात महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत केला बलात्कार
शिरुर तालुक्यातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटक
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…