क्राईम

शिरूर तालुक्यातील युवकाने व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला प्रेयसीचा नग्न फोटो…

पुणे : प्रियकराने ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने खळबळ उडाली आहे. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी शिरूर तालुक्यातील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र धरमचंद फुलपगार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक-युवती दोघेही प्रेमसंबंधात होते. काही दिवसांपूर्वी दोघाचे ब्रेकअप झाले. त्यानंतर प्रियकर देवेंद्र याने पीडितेला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रियकर तिचा मानसिक छळ करत होता. या सर्व छळाला कंटाळून शेवटी तिने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे आरोपीने प्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. ‘गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकला’ फोटो व्हायरल झाल्यानंतर पीडितेला मोठा धक्का बसला. या सगळ्या प्रकरणाची तक्रार युवतीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात दिली.

या प्रकरणी आरोपी असलेल्या देवेंद्रवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्याने तगादा लावला होता. गुन्हा मागे न घेतल्याने आरोपीने त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर युवतीचा नग्नावस्थेतील फोटो ठेवून ‘ये तो शुरुआत है’ असे स्टेटस ठेवले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago