पुणे : प्रियकराने ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने खळबळ उडाली आहे. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी शिरूर तालुक्यातील युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र धरमचंद फुलपगार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक-युवती दोघेही प्रेमसंबंधात होते. काही दिवसांपूर्वी दोघाचे ब्रेकअप झाले. त्यानंतर प्रियकर देवेंद्र याने पीडितेला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रियकर तिचा मानसिक छळ करत होता. या सर्व छळाला कंटाळून शेवटी तिने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे आरोपीने प्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. ‘गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकला’ फोटो व्हायरल झाल्यानंतर पीडितेला मोठा धक्का बसला. या सगळ्या प्रकरणाची तक्रार युवतीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात दिली.
या प्रकरणी आरोपी असलेल्या देवेंद्रवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्याने तगादा लावला होता. गुन्हा मागे न घेतल्याने आरोपीने त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर युवतीचा नग्नावस्थेतील फोटो ठेवून ‘ये तो शुरुआत है’ असे स्टेटस ठेवले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.