Shirur Robbery
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे घराचा दरवाजा तोडून रोख रकमेसह दागिण्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. तब्बल साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
आमदाबाद येथील सुभाष पंढरीनाथ नऱ्हे यांच्या बंद घराचा दरवाजा उचकटून घरातील दोन तोळे वजनाची गळयातील सोन्याची चैन, दिड तोळे वजनाचा सोन्याच्या दागीण्याचा नेकलेस, दोन तोळे वजनाचा सोन्याच्या दागीण्याचा राणी हार, पावणे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, एक तोळे वजनाचे कानातील सोन्याचे झुमके वेल कर्णफुले, दिड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, एक तोळे वजनाचे चांदीच्या दागीण्यातील एक जोड जोडवे, पायातील दोन जोड पैजन व ११ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण अंदाजे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
याबाबत सविस्तर हकिकत अशी की, दिनांक ०८ ते रात्री ११ ते दि. ०९ रोजी ८ वाजण्याच्या दरम्याण आमदाबाद फाटा गवळी वस्ती येथील सुभाष पंढरीनाथ नऱ्हे यांच्या राहत्या घराचा आतील बंद दरवाजाची कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने उचकटुन घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी पेटीतील सोन्या चांदीचे दागीणे व पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम असा अंदाजे एकुण साडेपाच लाख रुपयांचे दागीणे रोख रक्कमेसह घरफोडी करून चोरून नेले आहे. या घरफोडीबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…