ranjangaon-midc-police station

शिरूर! कारेगावात तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार करत थेट जीव घेण्याचा प्रयत्न…

क्राईम

कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याला संपविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळखीच्याच व्यक्तीने कोणत्यातरी कारणावरुन थेट गळ्यावर वार केल्याने ३५ वर्षीय इस्लाम सलाम शेख गंभीर जखमी झाला आहे. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी दानिश शेख याच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लाम सलाम शेख (वय ३५, रा. सरदवाडी, रामलिंग रोड, ता. शिरुर) हा दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास कारेगाव गावच्या हद्दीतील इंडियन ऑईल पेट्रोल पंप व कचरा डेपो परिसरात होता. यावेळी त्याच्या ओळखीचा दानिश शेख (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने कोणत्यातरी कारणावरून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपीने इस्लाम याच्या गळ्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यातून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

विशेष म्हणजे, हा हल्ला रात्रीच्या सुमारास पेट्रोल पंप व कचरा डेपो परिसरात घडला. ओळखीच्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नेमका वाद कशातून झाला…? हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य होते की अन्य काही कारण…? आरोपीने धारदार शस्त्राने गळ्यावरच वार का केला…? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत.

या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे करीत आहेत. शिरुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले, रांजणगावचे पोलीस निरीक्षक कुमार कदम आणि पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

शिरुर तालुक्यात उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक बसुन भाजलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

शिरुरमध्ये भरदिवसा घरफोडी; सव्वातीन लाखांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव भिशी प्रकरण; ‘व्याजाला सोकले अन् मुद्दलाला मुकले’ अशी गुंतवणुकदारांची अवस्था 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत