shirur-police

शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी शिरुर पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील सराफ कट्टा आणि मुख्य बाजारपेठेत सोमवार (ता. २६) रोजी सकाळी ७:३० वाजता पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने पायी पेट्रोलिंग करत परिसराची पाहणी केली. सणासुदीच्या काळात वाढणारी गर्दी आणि आर्थिक उलाढालीच्या पार्श्वभूमीवर चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, पाकीटमारी यांसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

सराफ कट्टा आणि बाजारपेठेवर विशेष लक्ष…
दिपावलीच्या काळात सराफ व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढत असल्याने चोरट्यांना संधी मिळण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शिरुर पोलिसांनी सराफ कट्टा, मुख्य बाजारपेठ, व्यापारी प्रतिष्ठाने आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी पायी गस्त घातली. पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती वाढवून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, संभाव्य गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करणे आणि व्यापारी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

सणासुदीच्या गर्दीत चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन…
दिपावलीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने आणि पैशांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सराफ व्यावसायिकांनी दुकानांतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करावी. दुकान बंद करताना सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी. मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जाताना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. बाजारपेठेत किंवा दुकानांच्या परिसरात संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून धोका पत्करण्याऐवजी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची सतर्कता…
दिपावलीच्या काळात शहरातील बाजारपेठा, सराफ कट्टा आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस गस्त व पेट्रोलिंग वाढविण्यात येत आहे. सणाच्या उत्साहात नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, तसेच व्यापाऱ्यांना निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी शिरुर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. दिपावलीच्या काळात नागरिकांनी सतर्क राहावे, व्यापाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता दिवाळीच्या पार्श्वभुमीवर सणासुदीच्या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शिरुर शहरात पारनेर, श्रीगोंदा आणि शिरुर या तीन तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक खरेदीसाठी येतात. त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनीही सतर्क राहून सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये सहकार्य करणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोणतीही व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्यास तात्काळ डायल 112 किंवा पोलिसांना कळवावे.
– रविंद्र भोसले (DYSP), उपविभागीय अधिकारी (शिरूर)

मुंबईतील २८ वर्षांचा अनुभव आता शिरूरच्या सेवेत; शिरूर पोलीस ठाण्याचा विनोद पाटील यांनी स्वीकारला पदभार

शिरूर पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी; महिलेला तिचे मंगळसुत्र परत

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत