Shirur Police Station
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात अलीकडे अवैध धंदे, जुगार आणि गुन्हेगारीत वाढ होत असताना दिसत असून, अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी क्षेत्रात ओढले जात असल्याचे चिंताजनक चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. सदर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी ‘सिंघम’ शैलीतील धडाकेबाज आणि निर्भीड पोलिस अधिकाऱ्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमध्ये जोर धरत आहे.
शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये खुलेआम जुगारांचे अड्डे, अवैध दारूव्यवसाय आणि इतर बेकायदेशीर धंदे सुरु असून, त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील सहभाग वाढत असल्याचे गंभीर आरोप स्थानिकांमधून व्यक्त केले जात आहेत. शिरूर तालुक्यातील एका शाळेत ‘एमडी’सारखे प्रतिबंधित आणि प्राणघातक ड्रग्स सापडल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघड झाला होता. परंतु, हा विषय ‘दाबून टाकण्यात आल्याची’ चर्चा पालक आणि सामाजिक संस्थांमध्ये अद्यापही सुरु आहे. पालक वर्गाचे म्हणणे आहे की असा प्रकार दाबल्यामुळे भविष्यात आणखी मोठे संकट निर्माण होऊ शकते.
शिरूर शहरातील नामाजलेल्या चौकात अल्पवयीन मुलांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की शहरात कायदा-सुव्यवस्थेचे नियंत्रण नक्की कोणाकडे आहे? अवैध धंद्यांच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना जाणीवपूर्वक वापरले जात असल्याची भीती स्थानिक सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे. “आज अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीमध्ये वापर होत आहे, उद्या हेच मुले भविष्यातील गुन्हेगार बनली तर जबाबदारी कोणाची?” असा सवाल समोर येत आहे.
शिरूर तालुक्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रभावी पोलिसिंगची गरज असल्याचे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. सध्याच्या परिस्थितीत शिरूरला निर्भिड, धडाकेबाज, दबंग आणि पक्षपात न करणारा ‘सिंघम’ प्रकारचा अधिकारी हवा, अशी मागणी सोशल मीडिया आणि स्थानिक बैठकीमध्ये जोरात होत आहे. शिरूर तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीत ओढले जाणे आणि बेकायदेशीर धंद्यांचा विस्तार ही गंभीर बाब असून यावर तातडीने कठोर करणे गरजेचे असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
मोटार सायकल चोरी करणाऱ्या शिरूर तालुक्यातील सराईत टोळीस अटक…
शिरूर तालुक्यात ‘तुला संपवतो, स्लॅबखाली टाकून देतो’, असे म्हणत गजाने केला हल्ला…
शिरूर तालुक्यात फायनान्सच्या हप्त्यावरून युवकाच्या डोक्यात फोडली बाटली…
शिरूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; तुझा कार्यक्रम करतोच…
शिरूर तालुक्यातील मेंढपाळ कुटुंबाला आंबेगाव तालुक्यात बेदम मारहाण…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…