Shirur Police Station
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला असून, त्याची ओळख पटवण्याचे आव्हान शिरूर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, पप्पू उर्फ विनोद शकर साठे (रा. इंद्रानगर, शिरूर, ता. शिरूर जि.पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे खबर दिली की, ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजण्याचे सुमारास ते त्यांच्या कामानिमित्त भंगारचे दुकानावर जात असताना पानाचे टपरीवर गेलो असता तेथे चायनिजच्या गाडयावर एक दिपक नावाचा अनोळखी पुरूष वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील हा झोपलेला होता. त्याच्या जवळ जावून पाहिले व त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याची काही एक हालचाल झाली नाही म्हणून विशाल जोगदंड यास फोन करून बोलावले त्यानंतर त्याल पाहीले असता प्रथम दर्शनी त्याला काही एक जखम झालेली दिसली नाही. मात्र, त्याची हालचाल बंद झालेली होती.
दिपक नावाचा अनोळखी पुरुष वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे हा मयत झालेला आहे. डोक्याचे केस काळे पांढरे वाढलेले, दाढीला काळे पांढरे केस वाढलेले, वर्ण काळा सावळा, बांधा मध्यम, अंगात निळे रंगाची जिन्स पॅन्ट, यक्सचा पांढरा शर्ट, अंडरवेल लाल रंगाची जॉकी कंपनीची, चेहरा गोल गाळयामध्ये वाघनके असलेले प्लॅस्टीकचा काळे रंगाचा गोप, उजवे हाताचा दंडावर सुर्या व त्यामध्ये शंकाराची पिंड असे गोंदलेले आहे. तरी सदर अनोळखी मयताची ओळख पटल्यास शिरूर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन शिरुर पोलिसांनी केले आहे.
शिरूर तालुक्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण…
शिरुर पोलीसांची धडाकेबाज कारवाई 3 गावठी बनावटीच्या पिस्तुलासह 10 जिवंत काडतूस जप्त
शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी बोकाळली; गुन्ह्यांची माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…