क्राईम

शिरूर तालुक्यातील विवाहित महिलेची वटपौर्णिमेच्या दिवशी आत्महत्या…

लोणीकंद: चुलत सासरे आणि त्यांचा नातू याने मालमत्तेच्या वाटणीवरून केलेल्या छळाला कंटाळून शिरसवडी येथे विवाहितेने वटपौर्णिमेच्या दिवशीच मंगळवारी (ता. 10) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मोहिनी सुक्रे (वय 28, मूळ रा. सुक्रेवाडी केंदूर, ता. शिरूर, सध्या रा. अंधेरी पश्चिम, मुंबई) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मोहिनी यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार चुलत सासरे दगडू नानाभाऊ सुक्रे व त्यांचा नातू भानुदास ऊर्फ विवेक सुक्रे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत मोहिनी यांचे पती योगेश सुक्रे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. 14) तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिनी यांनी त्यांच्या माहेरी मुरकुटेनगर शिरसवडी (ता. हवेली) येथे वटपौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चुलत सासरे दगडू सुक्रे व त्यांचा नातू भानुदास ऊर्फ विवेक सुक्रे या दोघांनी मालमत्तेच्या वाटणीवरून वेळोवेळी दिलेल्या धमकीमुळे, त्रासामुळे कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. या दोघांना कोणतीही माफी न देता त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. आपला मुलगा यश याची पती योगेश सुक्रे यांनी काळजी घ्यावी, असे कळकळीने या चिठ्ठीत मोहिनी यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, माझ्या पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक करून न्यायालयाने त्यांना कायदेशीर कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पती योगेश सुक्रे यांनी केली आहे. आरोपी फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

शिरूर! डॉक्टर पत्नीला मारहाण करणाऱ्या सासरच्या मंडळींविरूद्ध गुन्हा दाखल…

शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; १३ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात सुपूर्द

शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…

रांजणगाव तिहेरी हत्याकांड; लव्ह, सेक्स आणि धोका…?

शिरुर तालुक्यातुन २१ वर्षीय युवती बेपत्ता; कुटुंबीयांची पोलीसांकडे धाव

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

16 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

20 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

20 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

20 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

20 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

21 तास ago