मुख्य बातम्या

राष्ट्रमाता जिजाऊ अभिवादन यात्रेचे माताभगिनींनी केले जंगी स्वागत

शिरूर (किरण शेलार): बाबुराव नगर, हायवे सेंटर रोड स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ अभिवादन यात्रा ही सिंदखेड राजा येथून सुरू होऊन रायगड पाचाड येथे सांगता होणारी एक प्रेरणादायी यात्रा बाबुराव नगरमध्ये उत्साहात पार पडली. या यात्रेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे.

कार्यक्रमाच्या प्रमुख हेतूंबाबत बोलताना आयोजकांनी सांगितले की, “जिजाऊंचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजेत आणि प्रत्येक महिला जिजाऊ बनली पाहिजे.” या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती जिजाऊंच्या माहेरकडील ११व्या वंशज श्री. शिवाजीराजे जाधव यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

शिरूर येथील जिजाऊप्रेमी महिला एकत्र जमून जिजाऊंच्या रथाचे पूजन केले. यावेळी अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले व राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याचे स्मरण केले. उपस्थित महिलांनी एकजुटीचा संदेश देत जिजाऊंच्या कार्यावर आधारित “प्रत्येक महिला ही जिजाऊ झाली पाहिजे” असा संदेश दिला.

रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी “जय जिजाई, जय शिवराय” अशा घोषणा दिल्या व उपस्थित सर्वांचे स्वागत केले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले काही प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते पुढीलप्रमाणे:

धनश्री मोरे, जिजाबाई दुर्गे, मंगल कोठावळे, शितल शर्मा, गीता आढाव, सारिका नागवडे, सविता कासार, श्रीमंदिलकर काकू, अर्चना भागवत, जाधव काकू, पाचर्णे ताई, आणि बाबुराव नगर येथील अनेक महिला, गणेश देशमुख, शामकांत वरपे, राहुल भागवत, गणेश गव्हाड, व इतर मान्यवर उपस्थिती होते. या अभिवादन यात्रेमुळे जिजाऊंच्या विचारांची नवचैतन्याने उभारणी होत असून महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

13 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

4 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago