मुख्य बातम्या

शिरुर नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण व भंगार घोटाळ्यावर १५ दिवसांत खुलासा द्यायचा आदेश…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर नगरपरिषदेच्या सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये किंमतीच्या भंगाराची परस्पर विल्हेवाट, फूटपाथ व पूररेषेतील अतिक्रमणे, घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाने येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सहआयुक्त (नगर पालिका प्रशासन) व्यंकटेश दुर्वास यांनी शिरूर नगर परिषदेस दिले असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद व शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

भंगार साहित्याची चोरी, अतिक्रमणे, नगर परिषदेतून वीजचोरी, भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेतील घोटाळा, अनधिकृत मोबाईल टॉवर, बेकायदा पार्कींग आदी विषयांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिबूब सय्यद दहा जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तक्रारींची दखल घेतली गेल्याने त्यांनी शुक्रवारी (ता. १३) चौथ्या दिवशी उपोषण सोडले. आंदोलनातून मार्गी लागलेल्या विषयाची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही शिरुरकर फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बापू सानप, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, शहर अध्यक्ष ॲड. आदित्य मैड, शहर संघटक रवीराज लेंडे, अण्णा दौंडकर, राजेंद्र महाजन, रामभाऊ इंगळे, गणेश जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

नगर परिषदेतीलच एका अधिकाऱ्याने काही लोकांना हाताशी धरुन लाखो रुपयांच्या भंगार साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली असल्याच्या आमच्या तक्रारीची दखल घेत तक्रारीच्या अनुषंगाने येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन कागदपत्रे व पुरावे तपासून पुढील उचित कार्यवाहीचे आश्वासन नगर परिषदेने दिले असल्याचे सय्यद यांनी सांगितले. याप्रकरणी नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक डी. टी. बर्गे यांना सोमवार (ता. १६) पासून सक्तीच्या रजेवर पाठविले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे, असे ते म्हणाले.

शिरुर शहरातील पदपथावरील, पूररेषेतील अतिक्रमणे हटविण्याच्या मागणीबाबत नगर परिषदेने सकारात्मकता दर्शविली असून, अतिक्रमणधारकांसह नैसर्गिक नाल्यांवरील अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीसा बजावल्या असल्याचे व पोलिस बंदोबस्तासाठी पत्रव्यवहार केला असून, बंदोबस्त मिळताच अतिक्रमणे काढली जातील, असे आश्वासन दिले असल्याची माहिती बांडे यांनी दिली.

तसेच घनकचरा प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने न करता चुकीची बीले काढल्याच्या आमच्या तक्रारीचीही नगर परिषदेने दखल घेतली आहे. ज्या ठेकेदाराला हे काम दिले आहे त्यासोबतच्या अटी व शर्तींची तपासणी करून दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे.

बेकायदा पार्किंगबाबतची पोलिसांच्या मदतीने कार्यवाही, अनधिकृत मोबाईल टॉवर धारकांना नोटीसा, जीओ टॉवरकडून दुप्पट कर आकारणी, सांडपाणी व मलनिस्सारण प्रकल्प दुरूस्ती व नवीन मशिनरी, शहरातील रस्त्यांच्या कामांची चौकशी करून कार्यवाहीचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण विषयात मोठा आर्थिक घोटाळा झाला असून, त्याबाबत नगर परिषदेने दिलेल्या उत्तराने समाधान झालेले नाही. या विषयातील पुरावे गोळा करून पूरक माहिती प्रशासनाला देताना प्रलंबित विषयांबाबत पाठपुरावा सुरूच राहिल.

महिबूब सय्यद, उपाध्यक्ष,

पुणे जिल्हा मनसे

शिरुर तालुक्यातुन २१ वर्षीय युवती बेपत्ता; कुटुंबीयांची पोलीसांकडे धाव

शिरुर तालुक्यातील आलेगाव पागा येथून दोन दिवसांपासून तरुण बेपत्ता; कुटुंब चिंतेत

शिरुर; पारोडीत वीज पडून दुमजली बंगल्याचे नुकसान घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

13 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago