pvc-drugs
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात ‘एमडी’ ड्रग, गांजा आणि इतर अमली पदार्थांनी आधीच तरुणाईला विळखा घातलेला असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरगुती, बांधकाम आणि शेतीच्या कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या पीव्हीसी पाईप चिकटविण्याच्या केमिकलयुक्त लिक्विडचा काही युवकांकडून थेट नशेसाठी वापर केला जात असल्याची गंभीर माहिती समोर आली असून, ग्रामीण भागात “स्वस्त नशेचे” नवीन जाळे पसरत असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे.
शिरूर तालुक्यातील काही गावांमध्ये ओसाड जागा, शाळांजवळील निर्जन परिसर, बंद इमारती, नदीकाठ आणि चौकाचौकात काही युवक हे लिक्विड बोटावर किंवा कापडावर टाकून त्याचा वास घेत असल्याचे प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत. काही युवक अक्षरशः दिवसभर नशेच्या गुंगीत फिरताना दिसत असल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे हे लिक्विड अत्यंत स्वस्त दरात आणि कोणत्याही हार्डवेअरमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने अल्पवयीन मुलांपर्यंतही ते पोहोचत असल्याची चर्चा आहे. ‘ड्रग मिळत नसेल तर पाईप चिकटविण्याच्या लिक्विडची नशा’ असा धोकादायक ट्रेंड काही भागात वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक पालकांची झोप उडाली आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या केमिकलयुक्त लिक्विडमध्ये घातक रासायनिक घटक असतात. त्याचा सतत वास घेतल्याने मेंदू, फुफ्फुसे आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्याच्या सेवणाने चक्कर येणे, मानसिक संतुलन बिघडणे, भ्रम निर्माण होणे, आक्रमक वर्तन, बेशुद्ध पडणे आणि दीर्घकाळात मृत्यूचाही धोका संभवतो.
शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांत ‘एमडी’ ड्रग्जच्या घटनांनी खळबळ उडवली असतानाच आता लिक्विडसारख्या वस्तूंचाही नशेसाठी वापर सुरु झाल्याने व्यसनाचे संकट किती खोलवर पोहोचले आहे, हे अधोरेखित होत आहे. गावोगावी चौकात उभ्या राहणाऱ्या टोळक्या, संशयास्पद हालचाली आणि वाढती गुन्हेगारी यामागे व्यसन मोठे कारण ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शिरूर तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही या गंभीर प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली असून, “आज गावोगावी तरुणाई नशेच्या गर्तेत ओढली जात आहे. त्यामुळे वेळेत कठोर पावले उचलली नाहीत तर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतील,” त्यामुळे एकीकडे पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी संघर्ष करत असताना दुसरीकडे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी नशा तरुण पिढीला अक्षरशः बरबादीकडे नेत असल्याचे भीषण चित्र शिरूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाने संयुक्त कारवाई करुन यावर नियंत्रण आणावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
रांजणगाव एमआयडीसीत अंमली पदार्थांवर मोठा छापा; ६.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
शिरुरमधून उघडकीस आली अंमली पदार्थांची ‘साखळी’ गॅरेज चालकापासून थेट पोलीस हवालदारापर्यंत धागेदोरे
रांजणगावात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त, २०३ किलो ‘बंटा’ गोळ्यांसह तरुण ताब्यात
शिरुरमध्ये सोने मोजन्याच्या वजन काट्याचा वापर आता एमडी ड्रग्ज मोजण्यासाठी…?
शिरुरमध्ये ‘एटीएस’ चा सर्जिकल स्ट्राईक; ‘एमडी’ ड्रग्ज विक्रेते रंगेहाथ पकडले, लाखोंचा साठा जप्त
आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…
मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…
मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…
मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…
मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…
मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…