मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC मध्ये विजेच्या धक्क्याची गंभीर घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा जीव धोक्यात…?

कारेगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या विद्युत दुरुस्तीच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून, विजेच्या खांबावर चढून काम करणाऱ्या कामगाराला अचानक विजेचा धक्का बसल्याने त्याचा हात गंभीररीत्या भाजल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा जीव धोक्यात आल्याची चर्चा औद्योगिक परिसरात रंगली आहे.

खात्रीलायक सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (दि १७) मे रोजी संबंधित कंपनीत विद्युत दुरुस्तीचे काम सुरु होते. विज दुरुस्तीचे काम सुरक्षितपणे करता यावे यासाठी संबंधित ठेकेदाराने महावितरणकडून रीतसर परवानगी घेऊन स्वतःच महावितरणचा फिडर बंद केला. मात्र, प्रत्यक्षात ज्या विद्युत खांबावर कामगार कामासाठी वर चढला त्या लाईनमध्ये विजप्रवाह सुरुच होता. सदर कामगार खांबावर चढल्यानंतर अचानक त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे त्याच्या हात गंभीर भाजला गेला. त्या कामगाराच्या हातात रबरी हॅन्डग्लोज असल्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित कामगाराला खाली उतरविण्यासाठी रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले. आणि संबधित युवकाला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. हा युवक परप्रांतीय असल्याचे समजते. त्याला पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मात्र, या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. फिडर बंद असल्याची खात्री न करता कामगाराला थेट विद्युत खांबावर चढविण्यात आले कां…? लाईन तपासणी आणि सुरक्षा प्रक्रिया पाळण्यात आली होती कां…?
काम सुरु करण्यापुर्वी ‘लाइन क्लिअरन्स’ घेण्यात आली होती कां…?
कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणे देण्यात आली होती कां…?
औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारच्या कामांदरम्यान “सेफ्टी प्रोटोकॉल” काटेकोरपणे पाळणे बंधनकारक असताना, येथे मात्र गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे, काही कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, अनेक कंपन्यांमध्ये काम लवकर पुर्ण करण्याच्या घाईत सुरक्षेच्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. या घटनेनंतर संबंधित इलेक्ट्रिकल ठेकेदार तसेच कंपनीतील इलेक्ट्रिकल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार कां…? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फिडर जर बंद असल्याचा चुकीचा संदेश देण्यात आला असेल किंवा योग्य तपासणी न करताच काम सुरु करण्यात आले असेल, तर हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून कामगारांच्या जीवाशी खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कामगार वर्गातून होत आहे. औद्योगिक वसाहतीत वाढत्या अपघातांच्या पार्श्वभुमीवर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी आता तरी जागे होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
(क्रमश:)

शिरुरमध्ये वादळी पावसाचा तडाखा; एक्सप्रेस फिडरच्या तारा तुटल्याने रांजणगाव MIDC तील पाणी पुरवठा ठप्प

रांजणगाव MIDCचा विकास की प्रदूषणाची शिक्षा? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते काय…

Video! रांजणगाव MIDC दहशतीत! कामगारांवर हल्ले आणि लूटमारीचे वाढले प्रमाण…

रांजणगाव MIDC परिसरात बेकायदेशीर दारू वाहतुकीचा पर्दाफाश; दोन तरुणांना अटक 

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

6 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

10 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

10 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

10 तास ago