क्राईम

शिरूर तालुक्यात दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथे भावाला व चुलत भावाला शिवीगाळ करू नको, असे समजावून सांगत असताना समजावून सांगणाऱ्यालाच दगडाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यात सुनील भाऊ गाडेबैल हे जखमी झाले आहे. शिरूर पोलिस स्टेशन येथे संभाजी गंगाराम गाडेबैल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी रात्रौ ७.३० च्या सुमारास कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गाडेबैल वस्ती येथे चारंगबाबा देव यांचा उत्सव चालू असताना कवठे येमाई गावातील सुनील भाऊ गाडेबैल यांच्या ओळखीचा संभाजी गंगाराम गाडेबैल (रा. गाडेबैल वस्ती, कवठे येमाई ता. शिरूर) हा सुनिल गाडेबैल याचा भाऊ गणेश भाउ गाडेबैल आणि चुलत भाऊ गणेश बापु गाडेबैल याना शिवीगाळ करत होता. सुनिल गाडेबैल हा त्यास समजावुन सागत असताना, त्याने सुनिल गाडेबैल यास शिवीगाळ दमदाटी करून, हातात मावेल असा दगड घेवुन त्याच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर मारून दुखापत करून, जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक माडगे हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात लाकडी दांडके, लोखंडी पाइप व कुऱ्हाडीच्या साहय्याने मारहाण; कारण…

शिरुर तालुक्यात नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपी बापाला अटक

शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

पुणे-नगर महामार्गावर अनोळखी महीलेला अज्ञात वाहनाची धडक, मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान

शिरुर शहरात पोलिसाचीच चारचाकी गाडी चोरीला, पोलिसांच्या गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

16 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago