crime
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मलठण येथे शेतजमिनीमधील पाइपलाइन न विचारता उकरल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला दमदाटी, शिवीगाळ करत लाकडी दांडके, लोखंडी पाइप व कुऱ्हाडीच्या साहय्याने मारहाण करत जखमी केले आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी येथील अनिल भाऊ कोळपे यांच्या घराच्या पाठीमागील शेत जमिनीमधील पाइप लाईन तेथील गेणभाऊ कोळपे, संजय शिंदे, अक्षय शिंदे, धोंडीबा कोळपे, बारकाबाई कोळपे यांनी न विचारता बेकायदा जमाव जमवून उकरली. त्याचा जाबविचारण्यासाठी गेलेल्या अनिल यांना त्यांनी शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके, लोखंडी पाइप व कुऱ्हाडीच्या साहय्याने मारहाण करत जखमी केले.
याबाबत सुनील भाऊ कोळपे (वय २६, रा. शिंदेवाडी मलठण) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी गेणभाऊ धोंडिबा कोळपे, संजय बाळू शिंदे, अक्षय विलास शिंदे, धोंडिबा माखा कोळपे, बारकाबाई गेणभाऊ कोळपे (सर्व रा. शिंदेवाडी मलठण) यांच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भगत करत आहे.
शिरुर तालुक्यात नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपी बापाला अटक
पुणे-नगर महामार्गावर अनोळखी महीलेला अज्ञात वाहनाची धडक, मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…