शिरुर (अरुणकुमार मोटे ) पुणे-नगर रस्त्यावरील सदरवाडी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत न्हावरे फाटा, कानिफनाथ मंदिर येथे अज्ञात वाहनाने एका अनोळखी महीलेला (वय अंदाजे 30 ) धडक दिली असुन वाहनचालक वाहनासहीत पळून गेला आहे. या धडकेत महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान शिरुर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि २६) ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास सदरवाडी गावच्या हद्दीत न्हावरे फाटा, कानिफनाथ मंदिर येथे कोणत्यातरी अज्ञात वाहणाने एका तीस वर्षीय अनोळखी महीलेला उडवले. तिच्या अंगावर जांभळ्या रंगाचा कुर्ता, पॅन्ट व हिरव्या रंगाचा स्वेटर या महिलेला धडक देवुन निघुन गेला आहे. कोणीतरी अज्ञात चालकाने स्वतःच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून अपघात करुन अपघाताची कोणतीही माहिती न देता तो निघून गेला आहे.
याबाबत ॲम्बुलन्स चालक सौरभ संतोश महाजन याने शिरुर पोलीस स्टेशन मध्ये खबर दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अरुण उबाळे करत आहे. मयताच्या डाव्या हातावरती इंग्रजीमध्ये ‘किर्ती’ असे नाव गोंधलेले आहे. फोटोतील व्यक्ती बाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ शिरुर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन शिरुर पोलिसांनी केले आहे.
शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर