Shirur Robbery
शिरूर: शिरूर तालुक्यातील बोऱ्हाडे मळा येथील अंगणवाडीतून टीव्ही, गॅस सिलेंडर, गोडे तेल, शेगडी, कुकर इतर किराणा वस्तुंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या आहारासाठी असलेल्या साहित्यावर चोरांनी डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिरूर पोलिस स्टेशन येथे रोहीणी अशोक बो-हाडे (वय ४८, रा. बो-हाडे मळा, रामलिंग यांनी तक्रार दिली आहे. अंगणवाडी, बो-हाडेमळा येथे १८ जून रोजी दुपारी २ ते १९ जून रोजी सकाळी साडे आठच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने अंगणवाडीचे कुलुप कोंडा तोडत एल सी डी टिव्ही, गॅस सिलेंडर, गोडे तेल, शेगडी कुकर इतर किराणा वस्तुंची चोरी केली आहे. एकुन १४,३००/- रूपये किंमतीचा मुददेमाल चोरत किराणा वस्तुची नासधूस करून नुकसानही या अज्ञात चोरटयाने केले आहे.
दरम्यान, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांचे मार्गदर्शनखाली पोलिस नाईक अशोक शिंदे करत आहेत.
कवठे येमाईत पुन्हा एकदा चोरी पावणे तीन लाख रुपयांचे साहित्य लंपास…
शिरुर; रांजणगाव येथील ‘अथर्व ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर उचकटून १६ लाख २५ हजारांचे दागिने चोरीला…
रांजणगाव MIDC परिसरात कोयत्याचा धाक दाखवुन मोबाईल चोरी करणा-या तीन सराईत आरोपींना अटक
शिरुर तालुक्यात हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी करत वृद्ध दाम्पत्याला गंभीर मारहाण
शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पाहा नावे…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…