पुणे: पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात दरोडा टाकण्याचा तयारीत असलेल्या चार गुन्हेगारांना भुईंज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पकडले आहे. चौघेही शिरूर तालुक्यातील आरोपी आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मौजे वेळे (ता. वाई, जि. सातारा) गावच्या हद्दीत ११ जून रोजी करुणा मंदिराच्या समोरील बाजूला पुणे ते सातारा रस्त्याच्या झाडीमध्ये अंधारात पाच जण मोटरसायकल बाजूला लावून बसले असून ते महामार्गा वरुन जाणा-या लक्झरी बस लुटणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक निरिक्षक श्री. गर्जे यांनी वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पथकाने सापळा लावून रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास अंधारात बसलेल्या व दरोडयाच्या तयारीत असलेल्या ४ संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या सोबत असलेला पाचवा साथीदार हा अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला. परंतु ताब्यात घेतलेल्या संशयीतांकडे विचारपूस केली असता, ते पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यातुन येवून खंबाटकी घाटामध्ये लक्झरी बस अडवून त्यातील प्रवाशांचे दागिने, पैसे लुटण्यासाठी त्या ठिकाणी थांबले असल्याचे त्यांनी सांगीतले. पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या अंगझडतीमध्ये एक सुरा, दोन लोखंडी रॉड, प्लॅस्टिकच्या पिशवीत मिरचीची पुड, मोबाईल तसेच दोन मोटर सायकल असे एकूण २ लाख ७९ हजार रुपयाचे साहित्य मिळून आले आहे.
रविराज वर्णेकर यांच्या तक्रारीवरुन भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पळून गेलेला आरोपी हा ३० ते ३५ वयोगटातील असुन त्या आरोपीचा शोध सुरु आहे. दरम्यान पकडलेल्या आरोपींची नावे संतोष बाळासाहेब चव्हाण (वय ३४), अक्षय दत्तात्रय शितोळे (वय २६), योगेश आनंदा वाळुंज (वय २५ तिघेही राहणार शिंदोडी ता. शिरुर जिंल्हा पुणे), सिध्दांत यशवंत कांबळे (वय ३१ राहणार निमोने ता. शिरुर जिल्हा पुणे) अशी आहेत.
जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम, एलसीबीचे पोलिस निरिक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे, फौजदार विशाल भंडारे, पोलीस अंमलदार ज्ञानदेव राजे, नितीन जाधव, आप्पासाहेब कोलवडकर,सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, अजय सपकाळ, सुहास कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
रांजणगाव MIDC मध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने होतेय मोठी आर्थिक फसवणुक…
शिरुर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हान…
शिरुर; रांजणगाव येथील ‘अथर्व ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर उचकटून १६ लाख २५ हजारांचे दागिने चोरीला…
तळेगाव-न्हावरे रोडवर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन पिकअप चालकाने ठोकली धूम…
शिरूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला आरोपी अखेर गजाआड…