तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे) : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी वनविभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता नागरिकांचा संयम सुटू लागला असून ‘जीवितहानी झाल्यावरच पिंजरा लावणार का?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
निमगाव म्हाळुंगी गावात तीन प्राथमिक शाळा व एक हायस्कूल असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालक चिंताग्रस्त आहेत. मुलांना शाळेत पाठवायलाही पालकांना असुरक्षित वाटू लागले आहे. मागील काही दिवसांमध्ये आण्णा पाटील चव्हाण यांच्या शेततळ्याजवळ तब्बल सात बिबट्यांचा कळप ग्रामस्थांना दिसून आला होता. याशिवाय संपत जायकर यांच्या शेळीवर देखील बिबट्याने हल्ला केला होता, तसेच जायकर वस्ती, गावडे वस्ती, चव्हाण वस्ती या भागात अनेक जनावरे व कुत्र्यांना बिबट्यांनी ठार केले आहे. मंगळवारी (ता. ४) बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला आहे.
ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे की, “पिंपरखेडमध्ये घटनेनंतर रस्ते बंद करावे लागले, तशी वेळ आमच्यावर आणू नका,” अशी तीव्र प्रतिक्रिया निमगाव म्हाळुंगीतील ग्रामस्थांनी नागरिकांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच सचिन बबनराव चव्हाण, उपसरपंच प्रदीप पवार, ग्रामपंचायत अधिकारी गुलाब भाऊसाहेब नवले तसेच ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावून बिबटे पकडावेत, अशी मागणी केली आहे.
शिरूर! पिंपरखेड परिसरातील बिबट्याचा अखेर खात्मा…
बिबट्यांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय…
बिबट्याने मुलाला ओढल्यानंतर रक्ताच्या गुळण्या अन् डोळे पांढरे झाले…
शिरूर! बिबट्याच्या भीतीने ९ शाळा बंद; शार्पशुटर टीम पिंपरखेडमध्ये दाखल…
शिरूर! बिबट्याला शूट करण्याची दिली परवानगी…
शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; वीस दिवसांत तिसरी घटना…
शिरूर तालुक्यात बिबट्याचा दहशतीचा कहर कायम; आठ दिवसांत दुसरा बळी…
शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी