क्राईम

शिरुरमध्ये पोलिसांत जबाब दिल्याने महिलेला मारहाण…

शिरूरः शिरूर पोलिसांकडे एका महिलेने जबाब दिला होता. यानंतर कारागृहामधून बाहेर आलेल्या दोघांनी महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरुर येथील आपुरक्या उर्फ आप्पा भोसले व देवराम भोसले यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले असताना दिपाली काळे या महिलेने पोलिसांच्या तपासामध्ये याबाबत जबाब दिले होते. त्यांनतर दोघांना कोठडी झालेली होती, सध्या दोघे बाहेर आलेले असता त्यांनी सदर महिला राहत असलेल्या ठिकाणी जात तू पोलिस स्टेशनला आमच्या विरोधात जबाब का दिला? तुझ्यामुळे आम्हाला जेल मध्ये जावे लागले, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत जवळील कुऱ्हाडने मारहाण करत जखमी केले.

याबाबत दिपाली भावेश काळे (वय ३० वर्षे रा. तहसील कार्यालय जवळ शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी आपुरक्या उर्फ आप्पा शंकर भोसले व देवराम आप्पासाहेब भोसले (दोघे रा. जोशीवाडी शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निलेश शिंदे हे करत आहे.

unique international school
शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह…

8 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा; एका गावात हातभट्टी उध्वस्त तर दुसरीकडे गुटखा जप्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…

9 तास ago

सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…

1 दिवस ago