इतर

शेतकऱ्यांसाठी ‘या’ 5 योजना ठरतायेत वरदान…

मुंबई: आपल्या देशात जवळपास प्रत्येक वर्गासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. ज्यांचा उद्देश गरजू आणि गरीब वर्गाला मदत करणे हा आहे. यामध्ये आरोग्य, रोजगार, विमा, रेशन अशा अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबविल्या जात आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक व इतर फायदे दिले जातात. त्याचबरोबर सध्या या योजनांचा लाभही मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत.

आज आम्ही तुम्हाला देशात सुरु असलेल्या अशा ५ योजनांबद्दल सांगणार आहोत. ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत आणि शेतकरी त्यांचा लाभ घेऊ शकतात. यापैकी ३ योजना या केंद्र सरकारच्या असून त्या सर्व राज्यांमध्ये लागू आहेत. मात्र दोन योजना या ठराविक राज्यांमध्ये लागू आहेत.

unique international school

१) पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकार चालवत असून देशभरातील शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, जे प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवले जातात.

२) पीएम किसान मानधन ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. ज्यामध्ये 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळते. परंतु या आधी, तुम्हाला तुमच्या वयानुसार प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही 18 ते 40 वर्षे वयोगटातील असल्यास अर्ज करु शकता. जर तुम्ही 18 वर्षांचे असाल तर तुम्हाला दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

३) प्रधानमंत्री कुसुम योजना या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यासाठी 60 टक्के अनुदान आणि 30 टक्के कर्ज देत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सौर पंप किंवा ट्यूबवेल बसवू शकतात. तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपला ठेवा विठूरायाचे हे सुंदर स्टेटस; लाईक, शेअर्सचा पडेल पाऊस

४) कूपनलिका योजना फक्त उत्तर प्रदेशातील या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो, कारण ही योजना यूपी सरकार चालवते. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात कूपनलिका बसवू शकतात. अशाच प्रकारची योजना इतर राज्यांमध्येही चालू होऊ शकते.

५) रयथू बंधू योजना तेलंगणा सरकार ही योजना अतिशय लोकप्रिय योजना असून अनेक सरकारं या योजनेचा अभ्यास करत आहेत. या योजनेंतर्गत, राज्य सरकार पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वार्षिक 10,000 रुपये आर्थिक सहाय्य पाठवते. जर तुमच्या नावावर स्वतःची जमीन असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

11 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

23 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

24 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago