क्राईम

शिरूर तालुक्यात महिलेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल…

शिक्रापूर: पारोडी (ता. शिरूर) येथे एका शेतकरी महिलेला अश्लील शिवीगाळ विनयभंग केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अशोक वामन ढमढेरे याच्यावर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोडी (ता. शिरूर) येथे अशोक ढमढेरे याचा एका शेतकरी महिलेशी वारंवार वाद होत होता. ३० जुलै रोजी सदर महिला तिच्या घरासमोर काम करत असताना अशोक सदर ठिकाणी आला होता. त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ, दमदाटी करत महिलेच्या मुलाला मारुन टाकण्याची धमकी दिली.

दरम्यान, महिला भयभीत झाल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार घरी सांगत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अशोक वामन ढमढेरे (रा. पारोडी ता. शिरूर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गीता बराटे या करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago