क्राईम

धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात जांबुत येथील १९ वर्षीय युवती ठार

सविंदण (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील जोरी मळ्यातील १९ वर्षीय पुजा भगवान नरवडे या युवतीवर ती घराबाहेर लघुशंकेसाठी गेली असता उसात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तिला हल्ला करून ठार केले आहे. ही युवती कला शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती.

जांबुत गावात यापुर्वी बिबट्याने एका बालकाचा व दोन महीन्यापुर्वी एका युवकावर हल्ला करुन ठार केले होते. पुन्हा याच गावात१९ वर्षीय युवतीवर हल्ला करुन ठार केलेली ही तिसरी घटना असून जांबुत परीसरासह बेट भागातील नागरीक प्रंचड भयभीत झाले असून वन विभागाच्या कारभारावर संतप्त झाले आहे. तसेच आमदाबाद येथे सोनवणे यांच्या शेळीवर हल्ला करुन ठार केले आहे.

बिबट्याने बेट भागात उच्छाद मांडला असून बिबट्याच्या हल्ल्यात या तीन जणांचा नाहक बळी गेला असून वडनेर, पिंपरखेड येथील नागरीक गंभीर जखमी केले आहे. शिरुर तालुक्यात बिबटयांची संख्या मोठया प्रमाणावर वाढल्यामुळे दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना बिबटयाचे दर्शन होत असून पशूधनाबरोबरच नागरीकांवर हल्ले होत असल्याने तीव्र प्रतिसाद ऊमटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

6 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

6 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

6 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

6 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

12 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

12 तास ago