हिंगणा: एकमेकांवरील प्रेमात नातं आड आले आणि प्रेमाचा भयानक शेवट झाला. प्रेमीयुगुलाने हावडा-नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खापरी येथे घडली आहे. दोघांचीही ओळख पटली असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
जितेंद्र नेवारे याचे आपल्या मावस बहिणीवर प्रेम होते. त्याचे लग्न झाले होतं. तो ड्रायव्हर म्हणून काम करायचा. बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. बायको माहेरी गेल्यानंतर तो आईसोबत एकटाच राहायचा. मावस बहिणीचे वरचेवर येणे जाणे होते. दोघांमध्ये प्रेम झाले आणि दोघांनाही लग्न करायचे होते. पण नातेवाईक आणि समाज आपल्याला स्वीकारणार नसल्यामुळे दोघांनी टोकाचा निर्णय घेतला.
जितेंद्र आपल्या मावस बहिणीला भेटायला गोंदियाला गेला. त्यानंतर ती त्याला भेटण्यासाठी नागपूरला आली. दोघांनी दिवसभर एकमेकांसोबत वेळ घालवला. त्यांनंतर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह रेल्वेच्या रुळावर आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. पोलिसांना घटनास्थळावरुन तुटलेले फोन मिळाले आहेत. त्यांनी या फोनची पूर्ण तपासणी केली. सायबर सेलच्या मदतीने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…